वेताळ प्रतिष्ठानच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
291

वेंगुर्ला : दि. २२ : वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस आयोजित सलग १५ व्या रक्तदान शिबीरास दात्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला. या शिबीरात एकूण ४६ रक्तदात्यांनी रक्तदान केलं.

श्रीमंत पार्वतीदेवीची वाचनालय तुळसच्या बहुउद्देशीय सभागृहात आयोजित रक्तदान शिबीराचे उदघाटन सरपंच शंकर घारे यांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने करण्यात आले.यावेळी व्यासपिठावर उपसरपंच सुशिल परब,वैद्यकीय अधिकारी डॉ.लादे,रक्तपेढी सावंतवाडीच्या तंञत्न्य उज्वला वाडेकर,परिचारिका मनिषा बागेवाड,प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.सचीन परुळकर,श्रमिक पञकार संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश कौलगेकर,पञकार सचीन वराडकर,रक्तमिञचे जिल्हा उपाध्यक्ष महेश राऊळ,वाचनालय अध्यक्ष सगुण माळकर,ग्रा.पं.सदस्य जयवंत तुळसकर,शेखर तुळसकर,सातेरी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.सुजाता पडवळ,सनी रेडकर,निखिल सिद्धये आदि मान्यवर उपस्थित होते.

वेताळ प्रतिष्ठानने कोरोना काळात जनजागृतीपर अनेक उपक्रम राबवले.त्याचबरोबर काळाची गरज जाणून कोरोना काळात दोन वेळा रक्तदान शिबीराचे आयोजन करुन प्रतिष्ठानने आदर्शवत काम केले आहे.असे प्रतिपादन सरपंच शंकर घारे यांनी केले.कौलगेकर यांनीही आपल्या समयोचित भाषणात प्रतिष्ठानचे कौतूक केले.यावेळी रक्तदान क्षेञात विशेष योगदान देणा-या वेंगुर्ले येथील सनी रेडकर यांचा सरपंच घारे यांच्या हस्ते शाल,श्रीफळ व प्रमाणपञ देऊन सत्कार करण्यात आला.सर्व रक्तदात्यांचे प्रतिष्ठानच्यावतीने रोप देऊन आभार व्यक्त केले.शिबीर यशस्वी होणेसाठी प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.कार्यक्रमाचे सुञसंचालन सचीव गुरुदास तिरोडकर यांनी स्वागत उपाध्यक्ष विवेक तिरोडकर यांनी तर आभार माधव तुळसकर यांनी मानले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.