जे आहे त्यात सुख माना : रवींद्र देशपांडे

0
134

सिंधुदुर्गनगरी : दि. २२ :  आपल्या मध्ये जे काही आहे त्यात सुख मानून जीवन जगायचे आहे. त्यातच खरा आनंद असतो. असे प्रतिपादन लायन्स क्लबचे प्रांतपाल रवींद्र देशपांडे यांनी केले. कोरोना महासंकट कालावधीत लायन्स क्लब कुडाळमध्ये राबवलेल्या विविध उपक्रमाबाबत अध्यक्ष सौ नयन भणगे यांचा इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लबच्या वतीने यावेळी गौरव झाला.

लायन्स क्लब ऑफ कुडाळ सिंधुदुर्ग या सेवाभावी संस्थेने गेल्या काही महिन्यात राबवलेल्या विविध उपक्रमाच्या अनुषंगाने प्रांतपाल रवींद्र देशपांडे यांनी शनिवारी रात्री येथील हॉटेल स्पाइस कोंकण येथे आयोजित कार्यक्रमाला भेट दिली. कार्यक्रमाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते लायन्स पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी कुडाळ अध्यक्ष सौ नयन भणगे, सचिव सागर तेली ,खजिनदार श्रद्धा खानोलकर ,झोन चेअरमन स्नेहांकिता माने ,बाळासाहेब सुभेदार, गुरुराज हत्ती ,लायन्स पदाधिकारी सीए सुनिल सौदागर, ऍड अजित भणगे , ऍड श्रीनिवास नाईक ,आनंद बांदिवडेकर, ऍड अमोल सामंत, प्रकाश नेरूरकर, डॉ नंदन सामंत, डॉ श्रुती सामंत ,डॉ विवेक पाटणकर ,मनोहर कामत, काका कुडाळकर, मंदार परुळेकर ,डॉ गौरव घुर्ये ,अनंत शिंदे ,नगरसेवक जीवन बांदेकर ,वैभव सावंत, गणेश म्हाडदळकर ,अभिजित जैतापकर, मंजुनाथ फडके, अस्मिता बांदेकर ,शैलेश मुंडये, ऍड मिहीर भणगे , जी दत्ताराम , अनुप तेली, डॉ मिलिंद बोर्डवेकर , डॉ सिद्धार्थ बांदेकर, मेघा सुकी ,देवेंद्र पडते, लायन्स पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री देशपांडे म्हणाले, कोरोना महामारी संकटात लायन्स क्लब कुडाळने अतिशय स्तुत्य उपक्रम राबवले. सामाजिक आरोग्य उपक्रमात या क्लबने चांगले योगदान दिले आहे. विशेष म्हणजे संपूर्ण 3234 डी 1या डिस्टिकमध्ये कोरोना महामारी संकटात दोनशे रिक्षाचालकांना रिक्षा सुरक्षा पडदा देऊन जी ऍक्टिव्हिटी राबविली ती खूपच भावली. हा उपक्रम डिस्टिकमध्ये अव्वल ठरलेला आहे .भविष्यातही लायन्स क्लबने असे उपक्रम राबवून समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण करावा .आपल्या क्लबचे ब्रीद ‘गंध’ आहे भविष्यात विविध उपक्रमांतून गंधांचे रूपांतर सुगंधात करू असे सांगत लायन्स क्लबच्या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

अध्यक्ष सौ नयन भणगे यांनी जुलै २०२० पासून कोरोना महामारी संकटात सर्वांच्या सहकार्याने विविध सामाजिक शैक्षणिक आरोग्य उपक्रम राबविण्यात आले . भविष्यातही सर्वाच्या सहकार्याने अनेक उपक्रम राबवू असे सांगितले. सौ माने यांनी सहा डिसेंबरला ओरिएंटल व सिक्यूआर विभागीय पातळीवरील बैठक होणार आहे. या बैठकीला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले. सागर तेली यांनी वर्षभरात जुलै ते नोव्हेंबर २०२० पर्यंत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली .लायन्स नवीन सभासद यांना सदस्यपत्र व लायन पिन देण्यात आली .कार्यक्रमाची सुरुवात डॉ. विवेक पाटणकर यांनी श्री गणेशमहिमा गीत सादर करून उपस्थिताना मंत्रमुग्ध केले. सूत्रसंचालन अस्मिता बांदेकर मंजुनाथ फडके यांनी केले. तर आभार ऍड श्रीनिवास नाईक यांनी मानले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.