आचरेकरच निद्रिस्त ; तर कुशेंनी ‘ती’ कागदपत्रे तयार ठेवावीत ; नगराध्यक्षांच प्रत्युत्तर

0
565

मालवण : दि. २२ : प्रशासन निद्रिस्त नाही तर आचरेकरच निद्रिस्त आहेत अशी टीका नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी केली आहे. मोकाट जनावर, मोकाट कुत्रे याबाबत निविदा प्रसिद्ध झाल्या आहेत. प्रशासनाकडून याबाबत माहिती घेतली असती तर कळले असते. त्यामुळे नगराध्यक्ष झोपले की आपण झोपला यांचे आत्मपरीक्षण करावे असा सल्लाही कांदळगावकर यांनी दिला. तर, मागील 4 वर्षा मध्ये गणेश कुशे यांनी मालवण मध्ये केलेल्या प्रॉपर्टी बाबत कागदपत्र सुध्दा तयार ठेवावी असं प्रतिआव्हान नगराध्यक्ष कांदळगावकर यांनी कुशे यांना दिलं आहे.

माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, नगरसेवक गणेश कुशे यांनी केलेल्या टिकेनंतर नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी प्रसिद्धी पत्रक काढून आचरेकर, कुशे यांना प्रत्युत्तर दिले आहे. कांदळगावकर यांनी म्हटलंय की, कुठलीही माहिती न घेता जाहीर व्यक्तव्य करीत आहेत. शासनाने अनलॉक करताना काही नियम घालून अनलॉक केले आहे. या मध्ये पर्यटकांची ज्या ठिकाणी निवास व्यवस्था आहे त्या ठिकाणी त्यांनी या नियमाचे पालन करणे बंधनकारक केले आहे आणि अश्या लेखी सूचना नप ने मालवण मधील निवासी हॉटेल मालकांना लेखी स्वरूपात कळविले आहेत. त्यामुळे सरसकट सर्वांची स्वॅब टेस्ट करण्याचं या नियमावलीत अंतर्भूत नाही. आचरेकर यांच्या मते 1 लाख पर्यटक येणार आहेत , म्हणजे 1 लाख लोकांची स्वॅब टेस्ट करायची का? कोरोनाचा प्रादुर्भाव हा जगभर आहे हे लक्षात घेता पर्यटक पण काळजी घेत आहेत.

संपूर्ण प्रशासन गेले सात आठ महिने तहान भूक बाजूला ठेवून हा लढा यशस्वी करत आहेत असे असताना त्याच्यावर टीका, अविश्वास आचरेकर दाखवतात ते निश्चितच या प्रशासनाचे मनोबल खच्चीकरण करणारे आहे. आचरेकर यांनी हंगाम संपत आला असताना अश्या सूचना मीडियातून करण्यापेक्षा हंगामाच्या सुरवातीला प्रत्यक्ष भेटून चर्चा केली असती तर त्यांच्या योग्य सूचनांचा निश्चितच विचार केला असता. आणि त्यांची तशी इच्छाही असेल. कारण ते एका बाजूने नगराध्यक्षांच्या कामाचे कौतुक करतात, आमदार वैभव नाईक यांच्या कामाचे कौतुक जाहीर व्यासपीठ वरून करतात. परंतु त्यांची हीच गोष्ट त्यांच्या पक्षातील लोकांना खटकत असणार त्यामुळे त्यांना नाईलाजास्तव अश्या भूमिका मिडियाद्वारे मांडाव्या लागत आहेत हे आम्ही समजू शकतो. त्यामुळे आचरेकर यांनी आपल्या नप च्या अनुभवावरून मालवणच्या विकासाच्या बाबत केलेल्या योग्य सूचना कराव्या त्यांचा निश्चित विचार केला जाईल . आचरेकर नाहीच तर कोणीही नागरीक, विरोधी पक्ष यांच्या योग्य सूचनांचा आदरच केला जाईल. फक्त या कोरोनाच्या कालावधीत कुठलही राजकारण करू नका. राजकारण बाजूला ठेवून आमचे आमदार, पालकमंत्री, खासदार, सर्व प्रशासन या संकटावर मात करण्याचा मनोमन प्रयत्न करत आहेत. त्यांचे कौतुक करायचे नसेल तर त्यांचे मनोधैर्य तरी खच्चीकरण करू नका.

आमदार यांनी पर्यटक यांनी मास्क वापरू नये असा सल्ला दिला नाही तर पर्यटक अतिथी देव भवो असल्याने त्यांना दंड करू नका तर त्यांना मास्क लावणे बाबत प्रबोधन करा, त्यांना मास्क वाटप करा , स्पीकर द्वारे मालवण मधील पर्यटन स्थळावर कोविडच्या नियमांचे पालन करा अशी जाहीर प्रसिद्धी द्या या सूचना केल्या. त्याप्रमाणे कार्यवाही सुरू केलेली असून याप्रमाणे सूचना करूनही त्या न पाळणाऱ्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई पण केली जात आहे . शनिवारी 21 तारिख ला 49 व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करून 5400/-
दंड वसूल केला गेला आहे. आमदार नाईक यांनी शासन स्तरावर प्रयत्न करुन किल्ला बोटसेवा, वॉटर स्पोर्ट्स याना परवानगी मिळवून देऊन मालवणच्या पर्यटन वाढीस मदत केली याबाबत पर्यटन व्यवसायिक यांचे कडून आमदारांचे अभिनंदन होत असल्याचे बघून विरोधक यांना पोटशूळ उठले आहे. आणि या मानसिकतेतून आमदार यांचे व्यक्तव्याचा विपर्यास करत आहेत. त्यामुळे आमदार आणि नगराध्यक्ष या मध्ये एकमत आहे. उलट आपली भूमिका दुटप्पी आहे. आमदार यांच्या भूमिकेला त्यांच्या समोर आपल्या पक्षातील बहुत्वाशी सदस्यांनी त्यावेळी सहमती दर्शवली होती आणि आता मीडिया मधून विरुद्ध प्रतिक्रिया देत आहेत. त्यामुळे जनतेशी खेळ आपण मांडला आहे . नागरिकांच्या भल्याच्या दृष्टीने आजही नगराध्यक्ष आजही आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.

मोकाट जनावर, मोकाट कुत्रे याबाबत निविदा प्रसिद्ध झाल्या आहेत . प्रशासनाकडून या बाबत माहिती घेतली असती तर कळले असतें. या वरून नगराध्यक्ष झोपले की आपण झोपला यांचे आत्मपरीक्षण करावे. त्या मुळे आंदोलन करण्यापेक्षा हे काम कस होइल या साठी प्रशासनाला सहकार्य करा.

गणेश कुशे यांनी नगराध्यक्ष आणि कंपनी यांचा भ्रष्टाचार बाहेर काढण्याची जी पोकळ धमकी दिली आहे त्याला मी शुभेच्छा देतो. एकदा हा प्रयत्न केला होता तेव्हा उपोषण सोडायला काय प्रयत्न करावे लागले हे त्यांनी अनुभवले आहे. खाऊन पिऊन उपोषण केल्याचे सर्व जनतेला माहीत आहे आणि मंडपात शेवटी आपण एकटेच शिल्लक राहिलात याचे ही स्मरण करावे. त्याच बरोबर मागील 4 वर्षा मध्ये आपण मालवण मध्ये केलेल्या प्रॉपर्टी बाबत कागदपत्र सुध्दा तयार ठेवावी असं प्रतिआव्हान कांदळगावकर यांनी दिल आहे.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.