माजी मंत्री प्रविण भोसलेंच्या वाड्यात संजु विर्नोडकर टिमच निर्जंतुकीकरण 

0
398
सावंतवाडी : दि २२ : माजी राज्यमंत्री राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रविण भोसले यांना  कोरोनाची बाधा झाल्यानंतर तिरोडा येथिल त्यांचा वाडा कंटेन्टमेन्ट करण्यात आला. तर कोव्हीड – 19 च्या नियमांच पालन करत माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले उपचारासाठी रुग्णालयात दाखल आहेत. पंचक्रोशीतील लोकांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून राष्ट्रवादीचे उद्योग, व्यापार सेलचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी सामाजिक कार्यकर्ते संजू विर्नोडकर यांच्याशी संपर्क साधला. तर संजु विर्नोडकर यांनी राजकारणापलीकडे जात “सेवाभावात राजकारण नाही ” हा आदर्श ठेवून त्वरीत भोसले परीवाराचा ऐतिहासिक प्रशस्त वाडा, श्री पाटेश्वर मंदिर, दरबार हॉलसह संपूर्ण वाडा  निर्जंतुक केला. माजी राज्यमंत्री प्रविण भोसले हे सावंतवाडीकरांचे अजातशत्रू नेते असुन अम्हाला त्यांच्याबद्दल आदर आहे. म्हणुन दोडामार्ग येथिल सॅनिटाईज कामे बाजुला ठेवून त्वरीत येथे कार्य केले असे संजु विरनोडकर म्हणाले. संजू विर्नोडकर टीमचा हा सामाजिक उपक्रम पाहुन प्रविण भोसले यांचे बंधू कर्नल सुभाष प्रतापराव भोसले यांनी या टिमचे कौतुक केले. गेले आठ महीने सचोटीने हि जनसेवा करत असल्याबद्दल धन्यवाद दिले. याकार्यात संजु विर्नोडकर, आकाश मराठे, संतोष तळवणेकर,तुषार बांदेकर, सचिन घाडी, सागर मळगावकर यानी सहभाग घेतला.  यावेळी कर्नल सुभाष भोसले, गौरी भोसले, आकाश शिंडे, पुरुषोत्तम शेणाई, मनोज वाघमोरे आदि उपस्थित होते.
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.