डिचोलीत व्हीजनच मोफत मोतिबिंदू, नेत्र तपासणी शिबीर

0
111

दोडामार्ग : दि २२ : शिक्षा व्हीजन आणि व्हीजन हॉस्पिटल यांनी संयुक्तपणे डिचोली येथील तारी सभागृहात आज मोफत मोतिबिंदू नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. जवळपास ३०० लोकांनी या तपासणी शिबीराला प्रतिसाद दिला.यावेळी डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी सविस्तर माहिती देताना सांगितले की टप्याटप्याने अशी शिबीर पुर्ण डिचोली तालुक्यात होणार आहे. शिबीरं फक्त डिचोली तालुका मर्यादित असली तरी याचा फायदा खुप लोकांना होणार आहे. या शिबीरामार्फत सगळयांना मोफत डोळे तपासणी आणि ज्यांना मोतिबिंदू आहे त्यांच मोफत ऑपरेशन विजन हॉस्पिटल मध्ये होणार असे आश्वासन डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी केले.यावेळी डॉ. दयानंद राव हे देखील उपस्थित होते. त्यांनी डॉ. शेट्ये आणि त्यांच्या या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.