सेंट पीटर चॅरिटेबल ट्रस्टच्या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
143

मालवण : दि. २२ : सेंट पीटर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मालवण शहरातील भरड भाट येथे मोफत नेत्र तपासणी शिबीर नुकतेच संपन्न झाले. या शिबिरात ४८ जणांची तपासणी करण्यात आली. ट्रस्टचे अध्यक्ष आगोस्तीन (मदलो) डोसोजा यांच्या निवासस्थानी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून हे शिबिर संपन्न झाले.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक व्हिक्टर डाँट्स, बाबला पिंटो, रोझरी स्कुल प्रिन्सिपल फादर मारिया दास, सोफियान नरोना, विवेकानंद नेत्रयालयचे डॉक्टर संदीप कदम, जॉन्सन रॉड्रीक्स, जेम्स फर्नाडिस, अशोक पराडकर, दीपक आडवनकर, अँथोनी फर्नाडिस, अमोल येरलकर, बाबू डायस, संचिता चिपकर, मिताली शिंदे, संगमी जाधव, दिलीप वायंगणकर, व अन्य उपस्थित होते.

समाजकार्य करत असताना सर्वसामान्य जनतेसाठी आरोग्य विषयक विविध उपक्रम राबविण्याचे सेवाभावी कार्य आगोस्तीन डीसोजा करत आहेत याचा आम्हाला अभिमान आहे. त्यांच्या सामाजिक कार्यात कसलीही मदत करण्यास आम्ही तत्पर आहोत असे डान्टस यांनी सांगितले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.