कायदा सुव्यवस्था राखत, चोऱ्या रोखणार : संजय धुमाळ

0
216

कणकवली : दि २२ : तालुक्यात नागरिकांशी सुसंवाद ठेवत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात येईल. पुढील काळात तालुक्यातील गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलिस आणखी जोमाने काम करतील. कणकवली तालुकातील कामकाज पाहता आवश्यक पोलिसांची संख्या जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे मागणी करणार आहे. गेल्या काही दिवसांत झालेल्या चोऱ्या घरफोड्या याबाबत दक्षतेने काम करत आरोपींना गजाआड केले जाईल ,असा विश्वास नवंनियुक्त पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी व्यक्त केला.कणकवली तालुका पत्रकार संघाच्यावतीने नूतन पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांची भेट घेण्यात आली. त्यांना पुढील वाटचालीस पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष भगवान लोके यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी सचिव नितीन सावंत, जिल्हा कार्यकारणी सदस्य सुधीर राणे,तुषार सावंत, ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर तांबट, स्वप्निल वरवडेकर आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.