“झी” वर उद्यापासून पुन्हा झळकणार बाबा टोपले

0
446

दोडामार्ग:
झी मराठीवरील “रात्रीस खेळ चाले” ही कमालीची लोकप्रिय झालेली मालिका उद्यापासून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येत असून “झी युवा” चॅनलवर या मालिकेचे प्रक्षेपण होत आहे._ _अगदी ग्रामीण रंगमंच ते थेट सिनेसृष्टीत दमदार एन्ट्री केलेल्या दत्ताराम उर्फ बाबा टोपले यांची या मालिकेत डॉक्टरची भूमिका असून त्यांची कलाकारी उद्या सोमवारी रात्री १०:३० वाजता प्रक्षेपित होणाऱ्या एपिसोड मध्ये ती प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे._
_मंगळवारी सुद्धा प्रक्षेपित होणाऱ्या एपिसोड मध्ये बाबा टोपले झळकणार आहेत. दोडामार्ग तालुक्यात प्रतिभावंत अभिनेता, युवा उद्योजक तथा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर असलेले भेडशी गावचे सुपुत्र बाबा टोपले यांचे या मालिकेद्वारे पुनरागमन होत असल्याने त्यांच्या मित्रमंडळी व ग्रामवासीयांत आनंदाचा माहोल आहे. डॉक्टरच्या भूमिकेत ते या मालिकेतुन पुन्हा एकदा चमकणार असून भेडशी बरोबरच आपल्या तालुक्याचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात झळकवणार आहेत. त्यामुळे आपल्या जिल्ह्यातील या प्रतिभावंत कलाकाराला पहायला विसरू नका असे आवाहन बाबा टोपले यांच्या मित्रपरिवाराकडून होत आहे. उद्या सोमवार पासून ते शनिवार पर्यन्त च्या रात्रो ठीक 10:30 वाजता “रात्रीस खेळ चाले” या मालिकेत ते झळकणार आहेत.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.