महाराष्ट्रात जंगलराज आणताय का…?

0
348

मुंबई : दि. २३ : मुंबईतील गोरेगावमध्ये एनसीबीच्या अधिकाऱ्यासह पथकावर ड्रग्ज तस्करांनी हल्ला केल्याची घटना रविवारी घडल्याचं समोर आलं. हल्ला करणाऱ्यांपैकी काहीजणांना अटकही करण्यात आली आहे. या घटनेनंतर भाजपानं कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत महाराष्ट्रात जंगलराज आणताय का?, असा सवाल केला आहे.

गोरेगावमध्ये एका ड्रग्ज तस्कराला अटक करण्यासाठी एनसीबीचं पथक गेलं होतं. त्यावेळी ही घटना घडली होती. या घटनेबद्दल भाजपाचे नेते आमदार आशिष शेलार यांनी ट्विट करून भाष्य केलं आहे. “मुंबईत ड्रग्ज पेडलर्सची चौकशी करणाऱ्या एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर हल्ला. ड्रग्ज रँकेट उघडे पडू नये म्हणून असे हल्ले कोण घडवून आणतेय? कुणाला सत्य समोर येईल याची भीती वाटतेय? हे हल्लेखोर कोण? त्यांचे रक्षक कोण? अधिकाऱ्यांवर हल्ले करुन जंगलराज आणताय का महाराष्ट्रात?,” असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला आहे.

 

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.