शिवसेनेच्या ‘या’ बड्या नेत्याच्या घरी ईडीचा छापा..!

0
1113

ठाणे : शिवसेना आमदार आणि प्रवक्ते प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरी ईडीचे पथक दाखल झालंय. पूर्वश, विहंग सरनाईक यांच्या घरी देखील ईडी अधिकारी पोहोचले आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांकडून सरनाईक कुटुंबांच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी सुरु आहे. सकाळी ८ वाजल्यापासून त्यांची चौकशी सुरु आहे.

कारण अस्पष्ट 

ईडीने हा छापा नेमका कोणत्या कारणासाठी टाकला ? हे थोड्यावेळाने स्पष्ट होईल. इन्फोर्समेंट डिरेक्टरची ही टीम सरनाईकांनी केलेल्या व्यवहारामध्ये आर्थिक घोटाळा आहे का ? याची चौकशी करत आहेत. सरनाईक हे सरनाईक हे स्वत: बांधकाम व्यावसायिक आहेत. ते शिवसेनेचे प्रवक्ता असून गेले ते शिवसेनेचे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. केंद्रात भाजपची सत्ता असल्याने भाजप ईडी सारख्या संस्थांचा वापर करुन भाजपविरोधात बोलणाऱ्या नेत्यांचे तोंड गप्प करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शिवसेनेकडून केला जातोय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.