आत्माराम चव्हाण यांच निधन

0
427

कणकवली : दि 25 : तालुक्यातील घोणसरी चव्हाणवाडी येथील प्रतिष्ठित नागरिक आत्माराम तातोबा चव्हाण ( वय ७१ ) यांचे वृद्धापकालाने घोणसरी येथील निवासस्थानी नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाने घोणसरी चव्हाणवाडीतील जुन्या पिढीतील व्यक्तिमत्व हरपले आहे. आरपीआय ( आठवले गट ) चे सांताक्रुझ मुंबई वॉर्ड क्रमांक ९९ चे अध्यक्ष नितीन चव्हाण यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चत पत्नी, मुलगा, ३ मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.