बांदा : दि 25 : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्यादृष्टीने राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार गोवा राज्याच्या सीमेवर बांदा येथे आजपासून थर्मल स्क्रीनिंग करण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. महाराष्ट्र – गोवा राज्याच्या सीमेवर बांदा टोलनाका परिसरात महसुल, आरोग्य व पोलीसांची पथके तैनात करण्यात आली आहेत.