लाईव्हचा दणका ; कामाला सुरुवात !

0
554

सावंतवाडी : दि २५ : शहरातून जाणाऱ्या जुन्या मुंबई-गोवा महामार्गावर काही भागात पुन्हा खडड्यांच साम्राज्य निर्माण झाल. सिंधुदुर्ग लाईव्हन याबबात सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा केला होता. दरम्यान, कोव्हीडमुळे अडचणी येत असून कामगार, निधी अभावी कामाला उशीर होत असल्याच अधिकारी वर्गाकडून सांगण्यात येत होत. दरम्यान, हे खड्डे वाढत गेल्यान अपघाताला आमंत्रण दिल जात होत. रस्त्याची अवस्था पाहता गंभीर घटना घडण्याची शक्यता होती.

सिंधुदुर्ग लाईव्हनं दिला होता दणका !

दरम्यान, सिंधुदुर्ग लाईव्हन सोमवारी सार्वजनिक बांधकामच्या कार्यालयाला धडक दिली. ‘मौत का खडडा’ बनायची वाट पाहत आहात का ? असा सवाल करत  चार दिवसात खड्डे बुजवण्याचा इशारा बांधकामला दिला. अखेर बुधवारी खड्डे बुजविण्याच्या कामाला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरुवात करण्यात आली. तर लवकरच नादुरुस्त रस्त्यावर डांबरीकरण करणार असल्याच सार्वजनिक बांधकामकडून सांगण्यात आल.

 

 

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.