भाजपचा कार्यकर्ता कधीही विकला गेला नाही : निलेश राणे

0
382

देवगड : दि 25 : दोन पक्ष मी जवळून पाहिले आहेत मात्र निवडणुकीच्या वेळी कधीही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता विकला गेला नाही . या पक्षात मला काम करण्याची संधी मिळाली हे आमचे भाग्यचं आहे. खासदार म्हणून संसदेत काम करताना अनेक वेळा दाऊद इब्राहिम बाबत प्रश्न भाजप नेत्यांनी उपस्थित केले. मात्र यावर कधीही उत्तर मिळाले नाही याबाबत काँग्रेसने मौनच धारण केले होते. जिद्द ,चिकाटी, व प्रामाणिकपणे काम केल्यामुळेच आज संपूर्ण देश मोदींच्या मागे उभा आहे. 2000 पूर्वीचा प्रवास खडतर होता आज मात्र देशात स्वबळावर भाजप निवडून येईल अशी स्थिती आज निर्माण झाली आहे. मोदी अठरा तास काम करतात पण राहुल गांधी 18 मिनिटे देखील बोलू शकत नाहीत.मोदीमुळेचं काश्मीर मध्ये भारताचा तिरंगा लागलेला पहायला मिळला.मोदी सत्तेत आल्यापासूनच राहुल गांधी बोलायला लागले असल्याची खरमरीत टीका माजी खासदार निलेश राणे यांनी राहुल गांधींवर केली.मोदींच्या हातात देश दिलाय याचे समाधान जनतेला वाटतेय . ब्रिटिशांनी भविष्याचा विचार करून केलेल्या सिस्टीम मुळेच आज मुंबई सुरक्षित आहे. जिल्ह्याच्या कलेक्टरच्या खात्यात पैसे देखील केंद्र सरकार कडून जमा होत आहेत पण ठाकरे सरकार मात्र काहीच करत नाही. काँग्रेसची सत्ता असती तर अजूनही राम मंदिराचा प्रश्न सुटलाच नसता मोदींच्या हातात देशाची सूत्रे दिल्यानंतरच जनतेच्या खात्यात रक्कम जमा होऊ लागली . सत्ता महत्त्वाची नसून विचारधारा महत्त्वाचे आहे . आपला नेता जर 24 तास पक्षाचे काम करत असेल त्याप्रमाणे जसं नेता काम करतो तसेच काम ग्रामीण स्तरावरील कार्यकर्त्यांनी देखील करणे अपेक्षित आहे. 2024 च्या निवडणुकीत खासदार आमदार जिल्हा परिषद पंचायत समिती सर्व ग्रामपंचायत मध्ये सर्वत्र भारतीय जनता पार्टीचा झेंडा दिसला पाहिजे असे प्रतिपादन माजी खासदार निलेश राणे यांनी जामसंडे येथील नलावडे सभागृह येथे आयोजित भाजप कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यक्रमा दरम्यान केले यावेळी भाजप संघटन सरचिटणीस जयदेव कदम, प्रमोद रावराणे, बाळा खडपे, सदाशिव ओगले, प्रभाकर सावंत,संतोष किंजवडेकर, नगराध्यक्षा प्रियांका साळसकर आदींसह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.