नारायण राणेंनी वेधलं जिल्हाधिकाऱ्यांच लक्ष ; हे आहे कारण !

0
937

सिंधुदुर्ग : दि 25 : माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी जिल्ह्यात वाढणाऱ्या लेप्टोस्पायरोसिसच्या केसबाबत जिल्हाधिकारी यांच पत्राद्वारे लक्ष वेधलंय. कोरोना महामारीमध्ये जिल्हा प्रशासन रुग्णांची चांगली सेवा करत असून कोरोनाचे रुग्णही बरे होत आहेत. तर जिल्ह्यात लेप्टोचे ८० रुग्ण आतापर्यंत सापडले असून १५ पेक्षा जास्त व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. त्यात लहान मुलांचा देखील समावेश आहे. कोरोनाचे रुग्ण संपत नाहीत तर लेप्टोच्या रुग्णसंख्येत वाढ होतेय. हि बाबा चिंतेची असून या साथीच्या तपासणीकरता शासनाकडून खास पथक बोलावून लेप्टोचे रुग्ण वाचवावेत अशी मागणी नारायण राणे यांनी जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांच्याकडे केलीय.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.