…आता दिखावा कशाला : विलास साळसकर

0
321

देवगड : दि 25 : खासदार नारायण राणे यांचा जनता दरबार 15 मिनिटामध्ये आटोपल्याने जनता दरबाराचा पुरा फज्जा उडाला आहे.जिल्हयाचे पालकमंत्री असताना जनता दरबार घेण्याचे कधी सुचले नाही.आणि आता जनता दरबार घेण्याचा दिखावा कशासाठी अशी घणाघाती टिका शिवसेना तालुका प्रमुख विलास साळसकर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केली आहे. आमदार नितेश राणे हे कणकवली विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करीत असताना नारायण राणे यांना जनता दरबार घ्यावा लागतो. हि नामुष्कीच आहे असा टोला साळसकर यांनी लगावला आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हयातील प्रश्न सोडविले जात आहेत. पालकमंत्री उदय सामंत,खासदार विनायक राउत यांच्या अथक प्रयत्नातून येथील जनतेच्या प्रश्नांचा निपटारा केला जात आहे.मात्र सिंधुदुर्गाचे गेली अनेक वर्षे नेतृत्व्‍ करीत असलेल्या नेत्याला जनतेच्या जवळ जाण्यासाठी अशी धावाधाव करावी लागते हे खरे दुदैव आहे. सिंधुदुर्गातील सत्ता स्थाने हातातून निघून जात आहेत हे लक्षात आल्यावर शेवटचा उपाय म्हणून हि धडपड सुरु आहे असा टोला शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर यांनी लगावला आहे.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.