सत्ताधारी आमदार, खासदारांवर तेलींच टीकास्त्र

0
364

सिंधुदुर्गनगरी : दि 25 : कोरोना नंतर जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसात लेप्टो साथीने डोके वर काढले असून ही साथ नियंत्रणात आणण्याकडे सत्तारूढ खासदार आमदार पालकमंत्री यांचे दुर्लक्ष झाले असल्याचा आरोप भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केला याबाबत जिल्ह्यातील जोखीम ग्रस्त गावात जि प पदाधिकारी जनजागृती मोहीम करणार असल्याचे त्यांनी सांगितले जिल्ह्यात उद्भवलेल्या लेप्टो साथ बाबत भाजपा जिल्हा अध्यक्ष राजन तेली यांनी बुधवारी मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन सत्तारूढ आमदार-खासदार पालकमंत्री यांना टार्गेट केले यावेळी जि प अध्यक्ष समिधा नाईक आरोग्य सभापती सावि लोके कुडाळ पंचायत समिती सभापती नूतन अहिर माजी उपाध्यक्ष रणजित देसाई माजी सभापती मोहन सावंत श्रीपाद तवटे आदी उपस्थित होते तेली यांनी सांगितले की जिल्ह्यात लेप्टो 109 रुग्ण पॉझिटिव्ह आहेत आतापर्यंत सरकारी आकडेवारीनुसार पाच जणांचा मृत्यू झाला मात्र आमच्या माहितीनुसार लेप्टो मुळे 18 ते 20 जण दगावले सल्याचा दावा त्यांनी केला याबाबत आपण राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना मेल करून लक्ष वेधले आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑक्‍टोबर महिन्यापासून लेप्टो चे 90 पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत त्यापैकी 15 पेक्षा जास्त व्यक्तींचा मृत्युही झाला आहे त्यात शाळकरी मुलांचा समावेश आहे गेल्या काही वर्षात जिल्ह्यात लेप्टो चे प्रमाण कमी कमी होत आले असताना अचानक यावर्षी या घातक आजाराने उसळी घेतली आहे अगोदरच कोरोना ने समाज जीवनात वेढलेले असताना सिंधुदुर्ग सारख्या जिल्ह्यात लेप्टो ची भर पडली हे चिंताजनक आहे खासदार नारायण राणे पालकमंत्री असताना त्यांच्या विशेष प्रयत्नाने त्या आजाराचे निदान करणारी लॅब मंजूर झाली होती परंतु त्याचा पुढील काळात योग्य तो पाठपुरावा झालेला दिसत नाही तरी या आजाराचा प्रतिबंध निदान उपचार याविषयी तातडीने पावले उचलावी अशी मागणी आरोग्य मंत्र्यांकडे केली असल्याचे त्यांनी सांगितले लेप्टो आजाराबाबत आरोग्य पथकाने सर्वे सुरू केला आहे 56 हजार 318 लोकांपर्यंत डॉक्सी सायकलीन गोळ्यांचे वाटप करण्यात आले आहे दुसरा टप्पा सुरू करण्यात आला असून जिल्ह्यात लॅपटॉप साथीची 217 गावे जोखीम ग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आली आहेत जिल्ह्यात 31 हजार 856 लोकांनी शेतामध्ये काम केले आहे त्यांच्या पर्यंत गोळ्या पोहोचविण्याचे काम करण्यात आले असून 38 पैकी 35 आरोग्य केंद्रात गोळ्या पोचविल्या आहेत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पदाधिकारी आरोग्य अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याबाबत आज तातडीची बैठक घेऊन याबाबत जनजागृती करण्यावर भर दिला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले जिल्ह्यातील खासगी डॉक्टरांकडे आलेल्या रुग्णांना बाबतची माहिती आरोग्य विभागाला देण्याचे आदेश देण्यात आले आहे कसाल कडावल माणगाव हिवाळे ओवळीये आधी परिसरात साथ सुरू झाली असून याकडे आरोग्य विभागाने विशेष लक्ष दिले आहे आता प्राथमिक आरोग्य केंद्र निहाय जिल्हा परिषदेचे पदाधिकारी जनजागृतीसाठी गावागावात भेटी देणार असल्याचे त्यांनी सांगितले

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.