शिवसेनेतर्फे उद्या शहीदांना श्रद्धांजली..!

0
86

वैभववाडी, दि. २५ : मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस तसेच वीर जवानांना उद्या २६ नोव्हेंबर रोजी शिवसेनेच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. एडगाव येथे सकाळी ११ वा शहीद विजय साळसकर यांच्या स्मारकाच्या ठिकाणी हा श्रद्धांजली कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत उपस्थित राहणार आहेत. तालुक्यातील शिवसैनिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे अस आवाहन तालुका प्रमुख मंगेश लोके यांनी केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.