माजी जि. प. सदस्य सुनील खडपे यांचे निधन

0
425

देवगड, दि. २५ : माजी जि. प. सदस्य आणि विजयदुर्ग येथील रहिवासी सुनील खडपे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. ते ५० वर्षे होते. सुनील खडपे हे काही कामानिमित्त देवगड येथे आले होते. यातच त्यांना हृदयविकाराचा त्रास जाणवू लागल्याने त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. सुनील खडपे हे विजयदुर्ग ग्रा.पं.चे काही काळ सरपंच होते. त्यांनी काही काळ पत्रकार म्हणूनही काम केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.