चाकूहल्ला प्रकरणातील संशयितांना जामीन मंजूर

0
147

सावंतवाडी : दि. २५ : गाडी पार्कींग करण्याच्या वादातून घडलेल्या चाकू हल्ल्या प्रकरणी महेश दाभोलकर रा. सावंतवाडी याला आज जिल्हा न्यायालयाने २५ हजाराचा जामीन मंजूर केला याप्रकरणी अँड. सुहेब डिंगणकर यांनी काम पाहिले.

सावंतवाडी शहरात ८ नोव्हेंबर रोजी रात्री सालईवाडा येथे गाडी पार्किंगवरुन महेश दाभोलकर व कुशल दाभोलकर या पिता पुत्रांनी शहरातीलच चेतन देउलकर आणि संतोष वागळे या दोघांवर चाकू हल्ला केला होता. यात त्या दोघांना दुखापत झाली होती. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याआधी मुलगा कुशल याला जामीन मंजूर झाला होता तर वडील महेश दाभोलकर यांचा जामीन फेटाळला होता. आज पुन्हा एकदा जामिनासाठी अर्ज केला असता जिल्हा न्यायालयाने २५ हजार रुपयांचा जामीन मंजूर केला.

 

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.