प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुलांचे भूमिपूजन

0
210

दोडामार्ग : ग्रामपंचायत माटणे येथे आज राजेंद्र अनंत पराडकर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व राजेंद्र म्हापसेकर उपाध्यक्ष जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुलांचे भूमिपूजन करण्यात आले. ग्रामपंचायत माटणेतुन सध्या 42 घरकुल मंजूर झालेली आहेत. सर्व लाभार्थ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी व उपाध्यक्ष जिल्हा परिषद सिंधुदुर्ग याच्या हस्ते मंजुरीचे आदेश देण्यात आले. सदर कार्यक्रमात प्रमुख पाहुणे यांनी घर बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे व अनुदान कसे दिले जाणार ह्याबद्दल मार्गदर्शन केले. यासाठी मिलिंद जाधव गटविकास अधिकारी, मनोजकुमार बेहरे सहाय्यक गटविकास अधिकारी, निलेश जाधव कृषि अधिकारी, गिरगोल डिसोझा विस्तार अधिकारी, संजय शेळके विस्तार अधिकारी, संजय कदम कनिष्ठ सहायक पंचायत समिती दोडामार्गचे अधिकारी वर्ग उपस्थित होते. श्रीम.किशोरी डिचोलकर सरपंच, रुपेश गवस व अन्नपूर्णा ग्रामपंचायत सदस्य, शर्मिला गवस, महादेव गवस व शिवानंद गवस ग्रामपंचायत कर्मचारी, लक्ष्मण नरसिंगराव पवार ग्रामसेवक व सर्व मंजूर लाभार्थी उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.