पालिकेच्या ‘त्या’ वरिष्ठ लिपिका विरोधात ह्युमन राईट्स करणार RTI खाली अर्ज

0
927

सावंतवाडी : पालिकेतील वरिष्ठ महिला लिपिक यांची ह्युमन राईट्स ट्रस्ट माहितीचा अधिकार अधिनियम कायदा 2005अधिकाराखाली माहिती देण्याचा अर्ज करणार असून वरिष्ठ लिपिक आसावरी केळबाईकर यांची सावंतवाडी नगर पालिकेमध्ये नियुक्ती करण्यात आलेली नियुक्ती पत्राची छायांकित प्रत व जातपडताळणीकरीता वरिष्ठ लिपिक पदासाठी पाठपुरावा केलेल्या आवश्यक कागदपत्राची छायांकित प्रत तसेच नेमणूक केलेल्या पत्राची प्रत मिळावी अशी मागणी ह्युमन राईट्सचे प्रदेश महासचिव अमित वेंगुर्लेकर करणार आहेत. तर नियुक्ती सहित आज तागायत त्यांच्या अक्त्यारित झालेल्या सर्व निर्णयांची अंमलबजावणी झालेल्या आदेशासहित व प्रलंबित असलेल्या सर्व अधिकृत, अनधिकृत कामांच्या निविदाची छायाकिंत प्रत मागविणार असल्याची माहिती दिली आहे.

 

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.