उपसरपंचाच्या मृत्यूस पोलीस पाटील जबाबदार ! ; त्यांच्यावर कारवाई करा नाहीतर…, कुटुंबीयांचा हा इशारा

0
1218

सावंतवाडी : दि २६ : कोरोना रुग्णाच्या नावाचा प्रचार व प्रसार करून कोरोनाच्या रुग्णाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या देवसू-दाणोलीचे पोलीस पाटील सचिन सावंत, सरपंच संजना सावंत यांच्यावर कायदेशीर करावी करावी अशी मागणी देवसू-दाणोलीचे दिवंगत उपसरपंच कै. महादेव सावंत यांच्या कुटुंबीयाने प्रशासनाकडे केली आहे.

पोलीस पाटलांचा द्वेषभावनेतून अपप्रचार 

देवसू-दाणोलीचे उपसरपंच असणारे कै. महादेव सावंत हे कोरोनाबधित आले होते. यावेळी दाणोली ग्रामपंचायतचे शिपाई अशोक सावंत यांना घेऊन पोलीस पाटील सचिन सावंत यांनी आपल्या घरातील रिक्षेवर भोंगा लावत माईकद्वारे दिवंगत उपसरपंच कै. महादेव सावंत हे कोरोनाबाधित असून त्यांच्या घराच्या हद्दीत कोणी जाऊ नये, त्यांच्या सोबत संबंध ठेऊ नये अस उपसरपंच महादेव सावंत यांच नाव वारंवार घेऊन द्वेषभावनेतून प्रचार आणि प्रसार केला असल्यचा आरोप दिवंगत उपसरपंच यांच्या पत्नी माधवी सावंत, बंधू प्रभाकर सावंत यांसह कुटुबीयांनी केला आहे.

उपसरपंचांना बसला मानसिक धक्का ! 

दरम्यान, कोरोनाबाधित व्यक्तीचे नाव घेऊन त्यांचा प्रसार आणि प्रचार करण्याचे लेखी आदेश दिले होते का ? असा सवाल सावंत कुटुंबाने केलाय. ज्यावेळी दिवंगत उपसरपंच जिल्हा रूग्णालायातून घरी परतले तेव्हा हा प्रकार त्यांना समजला. याचाच धस्का घेतल्यान त्यांच निधन झाल. पोलीस पाटील सचिन सावंत यांच्या कृत्यामुळे त्यांच मानसिक संतुलन देखील बिघडत गेल. पोलीस पाटील यांनी केलेल्या कृत्यांचा त्यांना मानसिक धक्का बसला. तर यातूनच त्यांच निधन झाल असा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

पोलीस पाटीलान पदाचा केला गैरवापर

दरम्यान, कुटुंबातील व्यक्तीना देखील वाईट वागणुकीला समोर जाव लागत आहे. तर क्वारंटाईन काळात देखील ग्रामपंचायत प्रशासनाकडून सहकार्य न मिळाल्याने लहान मुलांसह सर्वांचीच गैरसोय झाली. तर अत्यावश्यक वस्तू आणून देणाऱ्या ग्रामस्थांना देखील पोलीस पाटील सचिन सावंत पदाचा गैरवापर करून दमदाटी केली. त्यामुळे पतीला योग्य ती मेडिकल सेवा उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळेच त्यांच 3 नोव्हेंबरला निधन झाल. त्यांच्या निधनाला दाणोलीचे पोलीस पाटील जबाबदार असल्यान त्यांच्यासह सरपंच, कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी त्या दिवंगत उपसरपंचांच्या कुटुंबीयांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. तर कारवाई केली नाही तर जिल्हा प्रशासना आणि राज्य शासना विरोधात ग्रामस्थांसहित बेमुदत उपोषण करू असा इशारा दिवंगत उपसरपंच कै. महादेव सावंत यांच्या कुटुंबीयांनी केलाय. तर उपोषणा दरम्यान कोणतहि कृत्य घडल्यास त्याला शासन जबाबदार राहील असा इशारा देण्यात आलाय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.