भीषण अपघात ; दोघे जागीच ठार

0
65669

कणकवली, दि. २७ : सांगवे इथं दुचाकी आणि रिक्षा यांच्यात जोरदार धडक बसून अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता कि अपघातात दुचाकीवरील अमित प्रभाकर मेस्त्री, वय ४० आणि परशुराम अनंत पांचाळ, वय ४८ हे दोघे जागीच ठार झाले.

तर रिक्षामधील माधुरी मनोहर घाडीगावकर, वय ४७, बाळकृष्ण सदाशिव घाडीगावकर, वय ८०, मनोहर बाळकृष्ण घाडीगावकर, वय ४२, गणेश अशोक घाडी, वय ३० हे जखमी झाले. यातील काहींना गंभीर दुखापती झाल्या. हा अपघात कणकवली – कनेडी मार्गावरील सांगवे – केळीचीवाडी येथे शुक्रवारी दुपारी १ वा. सुमारास घडला. जखमींना कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी प्राथमिक उपचार करून तिघांना खाजगी रुग्णालयात तर एकाला ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थ, पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.