पालकमंत्री उदय सामंत उद्या जिल्हा दौऱ्यावर..!

0
577

सिंधुदुर्गनगरी, दि. २७ : राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे शनिवार  २८ नोव्हेंबरला सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे :

शनिवारी २८ नोव्हेंबरला सकाळी ७.५४ वा. मुंबई – मडगांव एक्सप्रेसने ओरोस, सिंधुदुर्ग येथे आगमन आणि मोटारीने सार्वजनिक बांधकाम विभाग शासकीय विश्रामगृह, ओरोसकडे प्रयाण करणार आहेत.

सकाळी ८.१५ वा. सार्वजनिक बांधकाम विभाग शासकीय विश्रामगृह, ओरोस येथे आगमन होणार असून सकाळी १०  वा. डीपीडीसी नवीन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधिक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या समवेत माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिम व कोरोना आजार प्रतिबंधात्मक उपाययोजना संदर्भात आढावा बैठक घेणार आहेत.

सकाळी १०.३० वा. डीपीडीसीच्या नवीन सभागृहात जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांच्या समवेत निःसमर्थ व्यक्तींसाठी जि.प. सेस ५ टक्के निधीचे नियंत्रण करण्याकरिता जिल्हास्तरीय समिती सभा होणार आहे. ११ वा. डीपीडीसीच्या नवीन सभागृहात विभागीय आयुक्त कोकण विभाग, अधिक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, उपविभागीय अधिकारी कणकवली, कुडाळ, जिल्हा भूमी अधिक्षक यांच्या समवेत मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ बाबत आढावा बैठक घेणार आहेत. ११ .३० वा. शरद कृषि भवन, सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना कार्यकारिणी बैठक होणार आहे.

दुपारी ३ वा. शरद कृषि भवन, सिंधुदुर्गनगरी येथे पत्रकार परिषद होणार आहे. तर सायं. ४ वा. शासकीय विश्रामगृह, ओरोस येथे महाविकास आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा समन्वय समिती बैठक घेणार आहेत. सायं. ५. ३० वा. सिंधुदुर्गनगरी येथून मोटारीने मालवणकडे प्रयाण करतील तर सायं. ६ वा. मालवण नगरपरिषदेच्या विविध विकासकामांचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.