द्वासे यांसारखे अधिकारी मिळणे म्हणजे भाग्य – नगराध्यक्ष बबन साळगावकर

0
724
सावंतवाडी : सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्याधिकारी विजयकुमार द्वासे यांची बदली डहाणू येथे झाली आहे. त्यानिमित्त सावंतवाडी नगरपालिकेच्यावतीने मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार द्वासे यांचा सत्कार करण्यात आला. काही दिवसांपूर्वी याबाबतचे त्यांना आदेश प्राप्त झाले असून त्यांच्या जागेवर सांगली येथिल राहूल इंगळे यांची नियुक्ती झाली आहे. मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार द्वासे हे गेली चार वर्षे सावंतवाडी पालिकेत कार्यरत होते. त्यांनी आपल्या काळात अनेक महत्वाची कामे केली आहेत. सावंतवाडी शहरात स्वच्छता मोहीम राबवून ती यशस्वी करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. तसेच पालिकेच्यावतीने राबविण्यात येणार्‍या विविध उपक्रमात ते अग्रेसर होते एक अभ्यासू मुख्याधिकारी म्हणून त्यांनी आपला कार्यकाल यशस्वी केला आहे. यामुळे डॉ द्वासे यांचा सत्कार पालिकेने केला. यावेळी नगराध्यक्ष बबन साळगावकर, उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, सर्व नगरसेवक, नगरसेविका, माजी नगरसेवक, पालिकेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.