नेता असावा तर निलेश राणेंसारखा…कार्यकर्ता असावा संजू परब यांच्यासारखा!

0
1063

सावंतवाडी : नेता असावा तर निलेश राणेंसारखा आणि कार्यकर्ता असावा तर संजू परब यांच्यासारखा..सुंदरवाडी महोत्सवाची हॅटट्रिक साजरी करताना याचं शब्दात कोकणवासीयांनी या एका अनोख्या नात्याचा उल्लेख केलाय. विद्युत रोषणाईचा झगमगाट, आसमंत डोलायला लावणारा संगीताचा ताल, बॉलिवूड च्या सीताऱ्यांच पावलं थिरकवायला लावणारा परफॉर्मन्स… आणि रसिकांचा अखंड जल्लोष… गेली दोन वर्षे हे चित्र सावंतवाडीत अनुभवायला मिळतेय ते सुंदरवाडी महोत्सवात. माजी खासदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून हा सुंदरवाडी महोत्सव प्रतिवर्षी साकारतोय. नेत्यांच्या संकल्पनांना मूर्त रूप देण्याचं एक मोठं काम कार्यकर्त्यांना करावं लागतं. याच एक अनोख्या नात्याची एक चांगली झलक या सुंदरवाडी महोत्सवाच्या रुपांन पाहायला मिळतेय. आपले नेते निलेश राणे यांच्या संकल्पनेतील सुंदरवाडी महोत्सव आपल्या सहकारी कार्यकर्त्यांच्या मदतीनं अतिशय भव्यदिव्य आणि ऐतिहासिक साजरा करतात ते निलेश राणे यांचे खंदे शिलेदार संजू परब. आयोजनासाठी व्यवस्थित नियोजन करणं, कमिटी तयार करणं, त्यावर देखरेख, मीडिया यासह आपल्या कार्यकर्त्यांना जपणं, अशी अनेक नाजूक काम ते अथकपणे थांबून पार पाडतात. त्यांच्या अथक प्ररिश्रमाने आज सुंदरवाडी महोत्सव तीन वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण करत आहे. केवळ महोत्सव नव्हे तर नेता, कार्यकर्ता आणि त्यांचा वैचारिक समन्वय कसा असावा याच एक रोल मॉडेल म्हणून आज सुंदरवाडी महोत्सवान आपली एक वेगळी ओळख बनवली आहे.
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.