तेलींनी आमने-सामनेच सेनेच आव्हान

0
573

कुडाळ : दि. ५ : आमदार वैभव नाईक यांनी आणलेला निधी कागदावर आहे, असे सांगणाऱ्या कुडाळच्या नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी आमनेसामने यावे. आमदार नाईकांनी किती निधी आणला व किती खर्च केला याचा लेखाजोखा आम्ही मांडतो. यासाठी नगराध्यक्ष ओंकार तेली जी वेळ, जे ठिकाण सांगतील तेथे येण्याची आमची तयार आहोत असे खुले आव्हान शिवसेना शहरप्रमुख संतोष शिरसाट यांनी दिले तर विकासकामात भ्रष्टाचार करणारे नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी आपण नक्की कोणत्या पक्षाचे ते जाहीर असे आव्हान शिवसेना गटनेते बाळा वेंगुर्लेकर यांनी दिले आहे.
काल.नगराध्यक्ष तेली यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार नाईक यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून आज शहरप्रमुख संतोष शिरसाट व नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिरसाट पुढे म्हणाले, कुडाळ मध्ये मच्छिंद्रनाथ कांबळी नाट्यगृहासाठी १३ कोटी चा निधी आमदार वैभव नाईक यांनी मंजूर करून आणला. त्याचे काम सध्या सुरु आहे. शहरात २ कोटीचे अद्ययावत असे क्रिडांगण उभारण्यात येत आहे. याची माहिती तेली यांनी घ्यावी. शहरातील सुलभ शौचालयाचा प्रश्न तेली यांना सोडवता आला नाही. तो प्रश्न आमदारांनी सोडविला मात्र सुलभ शौचालयाची स्वच्छता ठेवण्यासाठी ठेकेदार नेमता आला नाही. कुडाळ नगरपंचायत विरोधकांकडे असताना ५ वर्षांत कोट्यवधी रुपयांचा निधी जिल्हा नियोजन मधून देण्यात आला. नगराध्यक्ष तेली यांच्या नाकर्तेपणामुळे अग्निशमन व्यवस्था व भंगसाळ नदीवरील उद्यान हे दोन प्रकल्प धूळ खात पडून आहेत. आ. नाईकांनी ऐतिहासिक घोडेबांवसाठी १५ लाख मंजूर करून ते काम पूर्णत्वास नेले. नगरविकास विभागामार्फत आ. वैभव नाईक यांनी ५ कोटी निधी कुडाळ शहरासाठी मंजूर करुन आणला तो अखर्चित आहे. केंद्रात भाजपची सत्ता आहे. नगराध्यक्ष या नात्याने तेली यांनी किती पाठपुरावा केला व किती निधी आणला ते जाहीर करावे. कुडाळचा विकास खुंटण्यामागे नगराध्यक्ष तेली हेच सर्वस्वी जबाबदार आहेत, असा घणाघाती आरोप शिरसाट यांनी केला.
लॉकडाऊन काळात नगराध्यक्षांनी बाजारपेठ व व्यापाऱ्यांची दुकाने कशी बंद राहतील याची काळजी घेत आपले कसे दुकान चालू राहील हेच बघितले. भाजी मंडई असून नसल्यासारखी आहे. नगराध्यक्ष तेलींचा कारभार ‘अंधेर नगरी चौपट राजा’ असाच आहे. या पत्रकार परिषदेला नगरसेवक गटनेते बाळा वेंगुर्लेकर, सचिन काळप, जीवन बांदेकर, नगरसेविका मेघा सुकी, प्रज्ञा राणे, गवंडे, तालुका प्रमुख राजन नाईक, अतुल बंगे, राजू गवंडे, सुशिल चिंदरकर आदी उपस्थित होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.