परबवाडा उपसरपंचपदी संतोष सावंत..!

0
379

वेंगुर्ला, दि. ०८ : वेंगुर्ला तालुक्यातील परबवाडा ग्रामपंचायत उपसरपंचपदी भाजपचे संतोष सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक संदीप गवस यांनी काम पाहिले.

माजी उपसरपंच संजय मळगावकर यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी सोमवार दिनांक ७ डिसेंबर रोजी मतदान करण्यात आले. यावेळी संतोष सावंत यांचा एकच अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सरपंच पपू परब , माजी उपसरपंच संजय मळगावकर, ग्रामपंचायात सदस्य हेमंत गावडे, कृतिका साटेलकर, ग्लानेस फर्नांडिस, अर्चना परब, सखी पवार, भाजप जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना ऊर्फ बाळू देसाई, भाजप तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नांडिस, ता. सरचिटणीस बाबली वायंगणकर, सायमन आलमेडा,माजी सभापती सारिका काळसेकर, माजी सरपंचा इनासीन फर्नांडिस, सुनील परब, ता.चिटनीस समीर चिंदरकर, रवींद्र परब, सहदेव परब, नारायण परब, शेखर कोरगावकर, प्रताप परब, दिनेश गावडे, कांता देसाई, संदीप परब, दिनेश गावडे, अक्षय परब, सदानंद परब, गौरेश परब, प्रकाश परब, आदित्य परब, सर्वेश परब, सचिन सावंत, ओंकार सावंत, प्रथमेश परब, हितेश परब, दिनेश परब, राज सावंत, विशाल जाधव, अरविंद परब ग्रामपंचायत कर्मचारी राजा परब, सिद्धेश कापडोसकर इत्यादी उपस्थित होते .

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.