आदर्श शिक्षक पुरस्कारावरून सेना – भाजपमध्ये तू तू मैंं मैंं..!

0
622

सिंधुदुर्गनगरी, दि. १६ : जि.प. च्या आदर्ष शिक्षक पुरस्कारावरुन विरोधी पक्षाच्या सदस्यानी सत्ताधारी पक्षास घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र कोरोना महामारी मुळे आणी प्रस्तावांची संख्या कमी असल्यामुळे आयुक्तांच्या मंजुरीसाठी विलंब झाला. त्यामुळे मान्यता मिळाली नाही असा खुलासा जि.प. अध्यक्षानी केला मात्र विरोधी गटाचे समाधान झाले नाही. अखेर याविषयावर सदस्यांनी चांगलाच हंगामा केला. गटनेते रणजीत देसाई यांनी ही आक्रमकता दाखवत यावर्षी राज्यशासनानेही यावर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार दिले नसल्याचे सांगताच या वादावर पडदा पडला. मात्र या शिक्षक पुरस्काराच्या मंजुरीसाठी राज्यशासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय या सभागृहाने एकमुखी घेतला. या विषयात प्रदिप नारकर, अमरसेन सावंत, संतोष साटविलकर अंकुश जाधव, संजना सावंत, प्रितेश राऊळ, संजना सावंत आदिनी चर्चा घडवीली.

जिल्हा परिषदेमधील काही कर्मचार्‍यांच्या प्रतिनियुत्यांचा विषय या सभेत लक्षवेधी ठरला. काही कर्मचारी अनेक वर्षे प्रतिनियुक्तीवर मुळ नियुक्तीची जागा बदलून दुसर्‍याच ठिकाणी कार्यरत आहेत. ज्याठीकाणी त्यांची नियुक्ती आहे तेथे मात्र ते काम करत नाहित आणी प्रतिनियुक्ती असल्याने ती पदेही रिक्त दिसत नाहीत. काही कर्मचारी आणी अधिकारी मंत्रालयात प्रतिनियुक्तीवर मुंबईला पोहचले आहेत. हि बाबही या सभेत सदस्यांनी उघडकीस आणली. कासार्डे प्राथमिक आरोग्य केंद्र आणी मालवण पंचायत समितीच्या विस्तार अधिकार्‍यांच्या प्रतियुक्तीचा विषय अनेक वर्षे सुरु असून याचा जाब सदस्यानी मुख्य कार्यकारी अधिकर्‍यांना विचारला. जिल्हा परिषदेत बांधकाम ग्रामिण पाणी पुरवठा, लघु पाठबंधारे, अशा महत्वांच्या विभागात अधिकारी वर्गाची पदेही रिक्त आहेत. ही बाबही समोर आली. आधी प्रतिनियुक्तीचा विषय मार्गी लावा आणी रिक्त पदे भरण्याबात राज्य शासनाचे लक्ष वेधावे असे आदेश जि. प अध्यक्षांनी दिले.

जि.प. बांधकाम विभागाकडून निविदा मंजूर होणारी अनेक कामे निविदेच्या दरापेक्षा १० ते १५ टक्के कमी दराने मक्तेदार घेतात. काहीजण तर पोटमक्तेदार देतात त्यामुळे कामाचा दर्जा राहत नाही. अशा निविदा रद्द करा अशी सदस्याची मागणी होती. मात्र शिल्लक राहिलेले तीन महिने त्यातच ग्राम पंचायत निवडणूक आचार संहिता यामुळे ही कामे रखडून पडतील. म्हणून संबंधीत ठेकेदाराकडून दर्जेदार कामे करुन घेऊन घेऊ अशी ग्वाही कार्यकारी अभियंता अनामिका जाधव यांनी दिली. पोटमक्तेदार काम करित असतील तर अशी कामे तातडीने थांबवा अशा सूचना उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी दिल्या.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.