नववर्षाला आयजींची ‘सरप्राईज’ भेट..!

0
799

सावंतवाडी, दि. १६ : कोकण परिक्षेत्र विशेष पोलिस महानिरीक्षक संजय विलासराव मोहिते यांनी सावंतवाडी पोलिस ठाण्यास भेट दिली. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील गुन्ह्यांविषयी माहिती घेतली. तर अवैध दारू वाहतूक,हल्लेखोरीला चाप लावणार असं मत त्यांनी व्यक्त केल.

तर नविन वर्षाच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू वाहतूक रोखण्यासाठी पोलिस अधीक्षकांना प्रत्येक चेकपोस्टवर सरप्राईज पथक नेमण्याचे आदेश दिले. यावेळी एसपी राजेंद्र दाभाडे, उपविभागीय पोलिस अधिक्षक डॉ.रोहीणी सोळंके, पोलिस निरीक्षक शशिकांत खोत, सहाय्यक उपनिरीक्षक स्वाती यादव आदी उपस्थित होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.