जिल्हास्तरीय नेत्याचा तडकाफडकी राजीनामा ; भाजपला धक्का !

0
3287

सावंतवाडी, दि. १६ : तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या एका जिल्हास्तरीय नेत्यांन आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. हा राजीनामा पक्ष नेतृत्वाकडे पाठला असून हा जिल्हास्तरीय नेता गेले काही दिवस भाजपमध्ये अस्वस्थ असल्याची जोरदार चर्चा होती. अखेर त्या नेत्यानं आपल्या पदाचा राजीनामा देत आपली नाराजी व्यक्त केली आहे.

या नेत्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांची फळी असून शहरासह, गाव पातळीवर देखील त्यांनी संघटना बांधणी केली आहे. भाजपच्या पक्ष वाढित या नेत्याच मोठं योगदान होत. दरम्यान, निवडणुकांच बिगुल वाजत असतानाच हा नेता आता कोणता निर्णय घेणार याकडे भाजपसह अन्य पक्षांच लक्ष लागून राहिले आहे. तर तडकाफडकी दिलेल्या राजीनाम्यामुळे भाजपला धक्का बसला असून राजकीय वर्तुळातील ‘टिकटिक’ अधिकच वाढलीय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.