वासुदेव जाधवांचा प्रामाणिकपणा कौतुकास्पद !

0
385

सावंतवाडी, दि. १९ : रस्त्यात सापडलेला महागडा मोबाईल वासुदेव जाधव यांनी मालकाकडे परत दिला. जाधव यांच्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचं कौतुक होतंय. वासूदेव जाधव हा युवक किरणपाणी येधे दुकानावर येत असताना त्याला आरोंदा बायपास रस्त्यावर एक महागडा मोबाईल सापडला. त्याने तो मोबाईल आरोंदा चेकपोस्ट वर ड्युटीवर तैनात असलेल्या पोलीसांकडे दिला. सापडलेल्या मोबाईलवरून संपर्क साधला असता तो मोबाईल पालये गोवा येधिल विनोद घाडी या युवकाचा असल्याचे समजले. त्यांनी घाडी यांच्याशी संपर्क साधत हा मोबाईल मालकाकडे सुपूर्द केला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.