सावंतवाडीत निसर्गोपचार चिकित्सा केंद्र सुरु.!

0
436

सावंतवाडी, दि. २१ : सावंतवाडी येथील जीवनरक्षा हॉस्पिटल आणि एक्यू नेचर क्वेअर, पर्वरी-गोवा यांच्या संयुक्त विद्यमानं निसर्गोपचार चिकित्सा केंद्र सुरु करण्यात आलं आहे. या केंद्राचा शुभारंभ जीवनरक्षा हॉस्पिटलचे डॉ. शंकर सावंत यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर  जिल्हा पत्रकार संघाचे खजिनदार एड.संतोष सावंत, देशभक्त शंकरराव गव्हाणकर कॉलेजचे प्राचार्य यशोधन गवस, सिंधू सहयोग फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. प्रवीणकुमार ठाकरे, डॉ.  शर्वरी सावंत, योगतज्ञ शिवाजी दळवी, योग प्रशिक्षक उमेश गावडे, पंचगव्य सुदत्त ठाकूर, डॉ. अजित मटकर सौ दळवी आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. शंकर सावंत म्हणाले, निसर्गोपचार चिकित्सा केंद्र हे येथे सुरू झाले आहे ही बाब स्तुत्य आहे.  संतोष सावंत म्हणाले, शिवाजी दळवी यांचा अभ्यास आहे. निसर्ग हाच तुमचा डॉक्टर आहे. योगा’ पंचगव्य याचा अधिकाधिक लाभ घ्या.

गव्हाणकर महाविद्यालयाचे प्राचार्य यशोधन गवस म्हणाले, सावंतवाडी निसर्ग उपचार चिकित्सा पद्धत सुरू झाली आहे. हे केंद्र निश्चितच एक चांगली उंची गाठेल.

योगाभ्यास तज्ञ शिवाजी दळवी म्हणाले,  लकवा, मधुमेह, रक्तदाब, पोटाचे विकार, सांध्यांचे दुखणे, स्त्रियांचे आजार, थायरॉईड, कॅन्सर गाठी,  कोलेस्ट्रॉल, लठ्ठपणा, मणक्यांचे विकार यावर उपचारचिकित्सा पद्धत व ॲक्युप्रेशर सिंधुदुर्गात प्रथमच सुरू करण्यात येत आहे.  अशी सुविधा अन्य कोठे नसून या सुविधेचा लाभ घ्या.

योगा उपचार पद्धतीची  यावेळी माहिती देण्यात आली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.