शुटिंगबॉल पुनःजिवीतासाठी बांद्यात होणार स्पर्धा.!

0
253

दोडामार्ग, दि. २३ :  गावातील सर्वांचा आवडता खेळ असणारा शुटिंगबॉल सद्ध्या बांदा आणि परिसरातील गावात काही वर्षे बंद आहे. ग्रामीण भागातील हा खेळ पुनर्जीवित करण्यासाठी भाऊ मिशाळ मित्रमंडळाने प्रयत्न चालू केले आहेत. यासाठी बांदा-आळवाडी मैदानावर रविवार दि. २४.जानेवारी रोजी एकदिवसीय (फक्त दिवसाच्या) स्पर्धा आयोजित केल्या आहेत.

या स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित असून बांदा पासून तिराळी, सातार्डा, मळगाव, कुंब्रल या भागातील कोंडुरे, आरोंदे, मडुरे, सातोसे, सातार्डे, रोणापाल, शेर्ले, कास, मळगाव, माजगाव, इन्सुली, वाफोली, ओटवणे, विलवडे, कोलझर, कुंब्रल, रुमडाची गोठण, तळकट, डेगवे, मोरगाव, आडाळी, कळणे, डोंगरपाल, डिंगणे, सासोली, हेदूस, मणेरी, दोडामार्ग, पाल, पाटये, आयनोडे, कुडासे, वानोसी, पणतुर्ली, पिकुळे, उसप, भेडशी, साटेली, परमे, घोटगे, आवाडे, आयनोडे, कोनाळकट्टा, तिराळी, केर, मोर्ले या सर्व गावातील शुटिंगबॉल खेळाडूंनी या स्पर्धेत आपल्या गावातील संघ सहभागी करण्यासाठी भाऊ मिशाळ मित्रमंडळातर्फे आवाहन करण्यात आले आहे.

संघांनी सराव चालू केला नसेल तर सराव चालू करावा. हा पारंपरिक खेळ पुन्हा एकदा आपल्या गावात चालू करून करण्यासाठी सहकार्य करावे. इतर कोणत्याही खेळापेक्षा कमी खर्च असलेला आणि भरपूर व्यायाम होत असलेला हा आपला ग्रामीण भागातील खेळ आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भाऊ मिशाळ मित्रमंडळाचे कार्यकर्ते संघांपर्यंत पोहोचतीलच. स्पर्धेला अजून एक महिन्याचा कालावधी आहे. त्यामुळे शुटिंगबॉलच्या सर्व खेळाडूंनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असं आवाहन भाऊ मिशाळ मित्रमंडळानं केलय.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.