सावंतवाडीत एका कॉम्प्यूटर प्रशिक्षण संस्थेकडून विद्यार्थ्यांची फसवणूक

0
842
सावंतवाडी : सावंतवाडीत एका कॉम्प्यूटर प्रशिक्षण संस्थेकडून विद्यार्थ्यांची फसवणूक सुरु आहे. साखळी मार्केटिंग पद्धतीने इथं मार्केटिंग केलं जातं. परंतु या  कंपनीकडे कोणतीही अधिकृत कागदपत्रे नसल्याचा आरोप मानवाधिकार संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अमित वेंगुर्लेकर यांनी केलाय. सावंतवाडीत एका कॉम्पुटर प्रशिक्षणच संस्थेकडून गेल्या दोन महिन्यात मुलांची फसवणूक झाली होती. ह्या फसवणुकीसंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. हि संस्था मुलांची ग्रोथ डेव्हलपमेंट कोर्स शिकवते. कोर्सची फी १७ हजार ५०० तर दुसऱ्या कोर्सची फी १५ हजार आहे. एका विद्यार्थ्याला आपल्या बरोबर अजून ३ विद्यार्थ्यांना घेवून यायला सांगितलं जात. अस साखळी स्वरुपात मार्केटिंग केले जाते. येथे काही स्थानिक मुलांना नोकरीला ठेवले आहे. जेवढी अॅडमिशन होतील तेवढा त्यांना कमिशन व पगार दिला जातो. मुलांकडून १७ हजार ५०० रुपये भरून घेतले जातात. जर फी लेट झाली तर इथला अधिकारी त्यांच्या घरी जावून फी घेवून येतात. मुलांना कोणतीही सुविधा दिली जात नाही. हि कंपनी कोल्हापूरमधील आहे. पण या कर्मचाऱ्याकडे कोणतीही संस्थेची कागदपत्रे नाहीत.सर्व कायदेशीर कागदपत्रे दाखवा व कोर्स सुरु ठेवा अन्यथा दुकान बंद करा. असा इशारा मानवधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमित वेंगुर्लेकर यांनी दिला . 
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.