आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘राजा’चाच बोलबाला ; कल्पना बांदेकर यांच्या भूमिकेचही कौतुक

0
283

सावंतवाडी, दि. ०१ :  नाशिक इंटरनॅशनल शॉर्टफिल्म फेस्टिवलच्या अंतिम स्पर्धेचा निकाल जाहीर झालाय. यात सिंधुदुर्गातील स्थानिकांच्या कलाकृतीने साकारलेल्या ‘राजा’ या शॉर्टफिल्मचाच बोलबाला पाहायला मिळाला. या शॉर्टफिल्मला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा किताब मिळालाय. ‘राजा’चे दिग्दर्शक सावंतवाडीचे सुपुत्र संतोष बांदेकर यांना हा बहुमान मिळालाय. यामुळे सिंधुदुर्गच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय.

यापूर्वी ‘रोशनी’मध्येही बाजी 

औरंगाबादमध्ये झालेल्या रोशनी आंतरराष्ट्रीय शॉर्टफिल्म फेस्टीव्हलमध्येही लघुपटाला नामांकन मिळाले होते. अंतिम स्पर्धेत हा लघुपट बाजी मारू शकला नसला, तरी जगभरातून आलेल्या ५७५ लघुपटाला नामांकन मिळालं होत. त्याचबरोबर ‘राजा’ला विविध ठिकाणी पारितोषिक प्राप्त झाली आहेत.

काय आहे शॉर्टफिल्ममध्ये ? 

ही संपूर्ण शॉर्टफिल्म दशावतारी कलाकाराच्या आयुष्यावर बेतलेली आहे.रात्रीचो राजा, दिसाचो रंक या युक्तीप्रमाणेच दशावतार कलाकारांचं आयुष्य उलघडत जात. त्यांना मिळणार मानधन, रोज जगण्यासाठी करावी लागणारी धडपड तरीही कलेप्रती असलेलं निस्सिम प्रेम यावर उत्कृष्टरीत्या भाष्य करण्यात आलंय. हा सगळा संघर्ष पाहताना आपसूकच डोळ्याच्या कडा ओलावतात. उत्कृष्ट दिग्दर्शन आणि कलाकारांचा तगडा अभिनय त्यामुळे प्रत्येक दृश्य जिवंत  करण्यात यश आलय. पण त्यासाठी तुम्हाला हि शॉर्टफिल्म पहावी लागणार आहे.

स्थानिक कलाकारांचा भरणा 

दशावतारी कलाकाराच्या आयुष्यावर बनविण्यात या लघुपटात संपूर्ण स्थानिक कलाकारांचा सहभाग आहे.यात ‘राजा’ची भूमिका साकारणारे मामा तेजम, प्रसिद्ध अभिनेत्री, साहित्यिका, कवयित्री कल्पना बांदेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर बहुतेक कलाकार हे शिक्षण घेणारे असून काही शेती काम करत होतकरू कलाकार आहेत. यात कौस्तुभ बांदेकर, किशोर वाळके, नारायण लाड, शंकर वाळके, नंदु वाळके, किशोर सरनोबत, बाळा परब, केतन गोठोस्कर, सुनिल कदम, दिपक वाळके, नागेश नाईक हे कलाकार आहेत.

प्रसिद्ध अभिनेत्री कल्पना बांदेकर यांच्या भूमिकेचही होतय कौतुक 

यात चित्रपटात त्यांनी ‘राजा’च्या पत्नीची भूमिका साकारलीय. नवर्यामागे पैशांसाठी तगादा लावणारी बायको, तरीही प्रेम करणारी आणि सरते शेवटी नवर्यामागे खंबीरपणे उभी राहणारी अशा भूमिकेत त्या आपल्याला पाहायला मिळतात. या त्यांच्या भूमिकेचं सर्व स्तरातून कौतुक होतंय.

गेली ३० वर्ष कल्पना बांदेकर यांनी नाट्य आणि साहित्य क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिलय. त्यांच्या अनेक एकांकिका, नाटक यांना राज्यस्तरीय प्रथम परितोषिक मिळालेली असून अभिवाचनाचे अखिल भारतीय सर्टिफिकेटही मिळालय. मालवणी भाषेवर त्यांचं विशेष प्रभुत्व आहे. बांदेकर यांनी मराठी, मालवणी कवितांसाठी अनेक पारितोषिक पटकावली आहेत. रत्नागिरी आकाशवाणी इथ कथाकथन, कविता वाचनाचे अनेक कार्यक्रम होतात. बांदेकर यांनी ‘गुणसम्राज्ञी २००८’ चा किताबही त्यांनी पटकावलाय. त्याबरोबर इनरव्हील क्लब सावंतवाडीची कोकणकन्या या किताबासह सिंधुरत्न पुरस्कार, ज्ञानदीप पुरस्कार, हर हायनेस राणी पार्वतीदेवी यांचा पुरस्कार अशा अनेकविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलय. आतापर्यंत अनेक प्रकारच्या भूमिका साकारल्या असून मोठ्या फिल्ममध्येही त्यांनी काम केलय. टाटा इन्स्टिट्यूट या जागतिक किर्तीच्या कॉलेजमध्ये शिकलेल्या जिल्ह्यातील पहिली विद्यार्थिनी अशी त्यांची ओळख आहे. तसेच, जिल्ह्यातील पहिल्या महिला नेपथ्यकार म्हणूनही प्रसिद्ध आहेत.

 

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.