सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त कोचरेत कोरोना योद्धा महिलांचा सन्मान ; सरपंच साची फणसेकर यांचा स्तुत्य उपक्रम

0
268

वेंगुर्ला | प्रतिनिधी | दि. ०५ : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी ज्या महिलांनी आपल्या जीवाची पर्वा न करता या महामारीच्या कठीण परिस्थितीत कोचरा गाव सुरक्षित रहावा यासाठी अविरत सेवा दिली अशा गावातील व गावा बाहेरील आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, अंगणवाडी मदतनीस, महिला शिक्षिका यांचा सावित्रीबाई फुले जन्म दिनाचे औचित्य साधून कोरोना योद्धा म्हणून सरपंच सौ साची विकास फणसेकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.