इ – स्टोअर इंडियाबाबतच्या अफवांंवर विश्वास ठेवू नका : शैलेंद्र पेडणेकर

0
2374

सावंतवाडी | प्रतिनिधी | दि. ०६ : गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यातील काही लोकांकडून आमच्या कंपनी कामकाजाबाबत अज्ञानाने गैरसमजातून शंकाकुशंका उपस्थित केल्या गेल्या. वस्तुतः ज्यांना कंपनी कामकाजाबाबत माहिती हवी होती, अथवा हवी असेल त्यांना ती आम्ही यापूर्वी लेखी स्वरूपात दिलेली असून यानंतर ही आवश्यकता असेल त्यांना ती देण्यास आम्ही तयार आहोत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ई स्टोअर इंडीया प्रायव्हेट लिमिटेड अशा कोणत्याही कंपनीशी आमचा कसलाही संबंध नाही. ई स्टोअर इंडीया प्रायव्हेट लिमिटेड या हैदराबाद येथील कंपनीशी आमचा संबंध जोडून आमच्या कामकाज व कंपनी विषयी शंका उपस्थित करण्याचे काम केले जात आहे. हे पूर्णपणे गैरसमजातून व चुकीच्या माहितीच्या आधारे केले जात असल्याची माहिती शैलेंद्र पेडणेकर यांनी दिलीय.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही ई स्टोअर इंडीया प्रायव्हेट लिमिटेड अशी आमची कोणतीही कंपनी नाही. योगायोगाने अॅक्सिस ई काॅर्प सोल्युशनस् प्रायव्हेट लिमिटेड या आमच्या कंपनीच्या “इ स्टोर इंडिया” हा रजिस्टर ब्रँड असून त्या मार्फत दैनंदिन गरजेच्या वस्तू विक्री करण्याची दुकाने आहेत.

आमच्या वर नमूद दोन्ही कंपन्यांना पैकी कोणत्याही कंपनीकडून गुंतवणुकीच्या योजना राबवल्या जात नाहीत. आमच्या कंपनीसाठी मार्केटिंग करणाऱ्या लोकांना त्यांच्या विक्री, मार्केटिंग प्रमोशन व जाहिरात अथवा इतर कामाचा मोबदला कंपनीच्यावतीने त्यांना देण्यात येतो. त्यासाठी लागणारी आवश्यक ती कागदपत्रांची पूर्तता अशा मार्केटिंग प्रतिनिधी सोबत कंपनीने केली असून ज्यांना असे एक कामकाज करणे शक्य आहे त्यांच्या संमतीनेच हे कामकाज केले जात आहे. या कंपनीचे जिल्ह्यात अडीज वर्षापासून अतिशय सुरळीत काम सुरू असुन कंपनीशी निगडीत ग्राहकाची अथवा इतर कोणाची आतापर्यंत कसलीही तक्रार नाही. या उपरोक्त अन्य कोणाचीही शंका असल्यास आमच्याशी संपर्क साधल्यास त्यांच्या शंकेचे व तक्रारीचे निरसन केले जाईल.

अशी माहिती शैलेंद्र पेडणेकर, रौनक पटेल, सचिन सावंत, स्वप्निल गावडे तसेच आमचे वरिष्ठ सहकारी अनिल जाधव व इतर सहकारी वेदिक आयुक्योर हेल्थ अँड रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेड व अॅक्सिस ई काॅर्प सोल्युशनस् प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वतीने देण्यात आली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.