आमदार नितेश राणे यांच्या हस्ते दत्ता सामंत यांना नियुक्तीपत्र

0
1052

मालवण : दि ०७ : भाजपच्या प्रदेश कार्यकारणीवर निमंत्रित सदस्य म्हणून दत्ता सामंत यांची निवड करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही निवड जाहीर केली. आज दत्ता सामंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आ. नितेश राणे यांनी सामंत यांच्या घुमडे येथील निवासस्थानी हे नियुक्तीचे पत्र दत्ता सामंत यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी डॉ. मिलिंद कुलकर्णी, सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, राजू प्रभुदेसाई, संदीप भोजने, प्रतिमा भोजने, यासह मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.