पत्रकारांवर हक्कासाठी लाचार होण्याची वेळ येऊ देणार नाही : सुधीर केरकर

0
239
पणजी | ब्युरो न्यूज | दि. ०८ :  गोमंतक साहित्य सेवक मंडळ आणि गोवा मराठी पत्रकार संघातर्फे बुधवारी मराठी पत्रकार दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी प्रमुख पाहुणे गोवा शासनाचे  माहिती आणि  प्रसिद्धी खात्याचे संचालक  सुधीर केरकर, प्रकाश कुडीकर, अरविंद धुरी, जनार्दन नागवेकर आणि रामनाथ  देसाई यांचा सत्कार करण्यात आला.
 
यावेळी बोलताना सुधीर केरकर म्हणाले, निवृत्त झालेले संपादक, पत्रकार यांची माहिती गोळा करून त्यांना माहिती खात्यात सामावून घेण्याचा मनोदय वक्त करून गोवा शासनाचा माहिती आणि प्रसिद्धी खात्याच्या संचालक पदावर असेपर्यंत पत्रकारांना हक्कासाठी लाचार होण्याची पाळी येणार नाही असं  आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. आपल्याकडे काही  नसते तेव्हा संयम हवा आणि सगळे काही असते तेव्हा दृष्टीकोन हवा हा  दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांचा विचार जागवत केरकर म्हणाले, सामाजिक जाणीव महत्वाची आहे. चांगल्या उप्रक्रमांना आपल्या खात्याचे नेहमी सहकार्य राहिलं असे अभिवचनही त्यांनी दिले.
   
रामनाथ देसाई आणि जनार्दन नागवे यांनी मनोगत व्यक्त करताना आपले विचार व्यक्त केले. मंडळाचे अध्यक्ष रमेश वसकर यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष शंभुभाऊ बांदेकर यांनी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले. कार्यवाह चित्रा क्षीरसागर यांनी सत्कारमूर्तींचा परिचय करून दिला. कार्यकारी सदस्य लीना पेडणेकर यांनी आभार मानले.
ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.