बांदेकर्स यांच्या ‘कल्पना’ हाॅटेलचे पालकमंत्री केसरकर यांच्या हस्ते उद्घाटन

0
883

सावंतवाडी : सावंतवाडी येथील बांदेकर यांच्या  ‘कल्पना’ हाॅटेलचे पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते शानदार उद्घाटन झाले. तब्बल साठ वर्षाची उत्कृष्ट चवीची परंपरा जपलेल्या सावंतवाडी येतील बांदेकर यांच्या हॉटेल कल्पना ह्या शुद्ध शाकाहारी हाॅटेल सावंतवाडीकरांच्या दिमतीत उतरले आहे. पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यावर या हॉटेलला शुभेच्छा देत भविष्यात हे हॉटेल सावंतवाडीतील एक अग्रगण्य हॉटेल बनेल असा शुभसंदेशपालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिला आहे. सावंतवाडी शहरातील हे हाॅटेल ही एक पर्वणीच ठरणार असल्याचा दावा या हॉटेलचे मालक सौ.बांदेकर यांनी केला आहे. १९४८ साली सावंतवाडीचा मध्यवर्ती ठिकाणी बांदेकर यांनी हॉटेल सुरू केले होते. गेली पन्नास-साठ वर्षात हॉटेल चांगलेच नावलौकिकास आले. त्यानंतर नगरपालिकेचे बांधकाम चालू असताना गेले दोन-तीन वर्षे बंद ते बंद  होते. या इंदिरा संकुलाच्या गाळ्यात दोन माळ्यावर हाॅटेल सुरू झाले. पालकमंत्री दीपक केसरकर सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर त्यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. या हॉटेलमध्ये उत्तम दर्जाचा चहा, वडापाव, जम्बो वडा, उसळ, मिसळ, उत्कृष्ट सामोसे, शुद्ध शाकाहारी जेवण, जुन्या काळात लुप्त होत असलेली गोळ्याची आमटी, भेंडीची आमटी, कोकणी सोलकढी, गोड आमटी, स्पेशल झुनका, मालवणी उसळ, मालवणी कांदा भजी, कमी रुपयात व दर्जेदार रूपात मिळणार असल्याचा दावा बांदेकर यांनी केला आहे. हे हाॅटेल सुरू  झाल्यानंतर या हॉटेलचे जुने ग्राहक यांनी हॉटेल फुलून गेले होते. निश्चितच आपण दर्जेदार सेवा देऊन लोकांची मने जिंकू असा सौ. बांदेकर यांनी दावा केला आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.