सुसंस्कृत शहरात राडा संस्कृती खपवून घेतली जाणार नाही : पुंडलिक दळवी

0
396

सावंतवाडी | प्रतिनिधी | दि. १० : शिल्पग्राम हॉटेलची समाजकंटकांनी रात्रीच्या वेळी धिंगाणा घालून तोडफोड केली. त्या समाजकंटकांवर कारवाई होणे गरजेचे आहे. केवळ भाजपशी संबंधित असल्यानं नगरसेवक उदय नाईक यांनी
त्यांच्या चुकांवर पांघरूण घालू नये. अशा लोकांना पाठीशी घालणे ही दुर्दैवीबाब आहे‌. या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस आवाज उठवू संबंधित हॉटेल मालकाच्या पाठीशी उभी राहणार असं मत राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी व्यक्त केले.

तर सुसंस्कृत शहरात राडा संस्कृती डोकं वर काढत असेल तर त्याला ठेचल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा पुंडलिक दळवी यांनी दिला.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.