जिल्ह्यात चांगले खेळाडू निर्माण करण्यासाठी पूर्ण ताकद लावू : नितेश राणे

0
768

वेंगुर्ला | प्रतिनिधी | दि. ११ :  क्रिकेट मध्ये जी खेळाडूंना एक वेगळी लोकप्रियता मिळते त्याचे सोने करा. जिल्ह्यात ज्यावेळी अशा मोठ्या स्पर्धा आयोजित होतात त्यावेळी उत्तम खेळासोबतच एक वेगळा उत्साह पाहायला मिळतो. पुढील काळात जिल्ह्यात चांगले खेळाडू निर्माण करण्यासाठी पूर्ण ताकद लावू अशी प्रतिक्रिया आमदार नितेश राणे वेंगुर्ला येथे दिली.

छत्रपती क्रीडा मंडळ आयोजित सिंधुदुर्ग प्रीमियम लीग “छत्रपती चषक २०२१” स्पर्धा रविवारी संपन्न (१० जाने) झाली. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमावेळी आमदार राणे बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष दिलीप गिरप, माजी नगराध्यक्ष प्रसंन्ना कुबल, जि प सदस्य प्रितेश राऊळ, दादा कुबल, माजी उपनगराध्यक्ष अभिषेक वेंगुर्लेकर, नगरसेवक नागेश गावडे, शैलेश गावडे, भाजप तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक सुहास गवंडळकर, बांदा सरपंच अक्रम खान, देवगड नगरसेवक नीरज घाडी, देवगड संघमालक उत्तम बिर्जे, मच्छिमार नेते दादा केळुस्कर, वसंत तांडेल, शिरोडा सरपंच मनोज उगवेकर, भाजप तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर, परबवाडा सरपंच पपू परब, सोमनाथ टोमके, मनिष दळवी, तुषार साळगावकर, मनवेल फर्नांडिस, भूषण अंगाचेकर, भूषण सारंग, शेखर काणेकर, बाळू प्रभू, प्रणव वायंगणकर, अमेय धुरी साईप्रसाद भोई यांच्यासाहित इतर मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धेतील विजेता एमएसआरटी संघ, तुळस व उपविजेता संघ बांदेश्वर बांदा या संघाना रोख रक्कम व आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच तृतीय क्रमांक बॉथम वोरीअर्स वेंगुर्ला, चौथा क्रमांक संघ जित चेंदवण, मालिकावीर राजन केरकर, उत्कृष्ट फलंदाज सावंतवाडीचा रिचर्ड, उत्कृष्ट गोलंदाज शंकर म्हाडगुत, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ऋषी हरमळा, उदयोन्मुख खेळाडू ऍलिस्टर फर्नांडिस, उत्कृष्ट यष्टीरक्षक राधाकृष्ण पेडणेकरकर याचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. स्पर्धेचे समालोचन व बक्षिस वितरण सूत्रसंचालन बादल चौधरी, समीर पांढरे, अशोक नाईक, योगेश परब, जय भोसले, काका सावंत, संतोष मर्ये यांनी केले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.