शोभा परब यांना जिजाऊ पुरस्कार..!

0
252

वेंगुर्ला | प्रतिनिधी | दि. १३ : परबवाडा येथील श्रीमती शोभा परब यांनी आपल्या पतीच्या निधनानंतर प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात रोजंदारी करुन स्वतःच्या मुलांना घडविले. आज त्यांचा मुलगा अॅड.मिलिद परब हा मुंबई हायकोर्टात प्रतिथयश वकील आहे. अशा पद्धतीने समाजामध्ये वेगळा आदर्श निर्माण केलेल्या श्रीमती परब यांना राजमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित्त भाजपा वेंगुर्ल्याच्या वतीने कोकण विकास आघाडीच्या पदाधिकारी व गोरेगाव-मुंबई येथील भाजपा महिला नेत्या सुमन सावळ यांच्या हस्ते जिजाऊ पुरस्कार देवून गौरविण्यात आले.

यावेळी भाजपाचे प्रसन्ना देसाई, सुहास गवंडळकर, दिलीप गिरप, निलेश सामंत, अॅड.सुषमा प्रभूखानोलकर, पूनम जाधव, श्रेया मयेकर, साक्षी पेडणेकर, प्रशांत आपटे, शितल आंगचेकर, प्रार्थना हळदणकर, साईप्रसाद नाईक, बाबली वायंगणकर, प्रशांत खानोलकर यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.