शाब्बास..! सिंधुदुर्गातील ‘हे’ शहर कोरोनामुक्त

0
1555

सावंतवाडी | प्रतिनिधी | दि. १३ : सावंतवाडी शहर कोरोनामुक्त झालं असून सध्या एकही सक्रीय रूग्ण नाही आहे. आतापर्यंत ३४४ जण हे बाधित आढळले होते. यातील ३२८ जण बरे होऊन घरी परतले. तर १५ जणांचा कोरोनानं मृत्यू झाला.

शहर कोव्हीड मृक्तीकडे नेण्यात नगराध्यक्ष संजू परब, तत्कालीन मुख्याधिकारी संतोष जिरगे, माजी आरोग्य सभापती अँड परिमल नाईक, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश मसुरकर , पालिकेचे सर्व नगरसेवक, पालिका कर्मचारी दिपक म्हापसेकर, रसिका नाडकर्णी, श्री. टोपले आदींसह पालिकेचे अधिकारी कर्मचारी, विशेषतः सफाई कर्मचारी, नागरिक यांचा मोलाचा वाटा आहे.

दरम्यान, नगराध्यक्ष संजू परब यांनी या टीमच कौतुक करत कोरोना पासून शहर कायमच मुक्त करण्यासाठी सूचना दिल्यात.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.