उद्योजिका सुप्रिया पाटील ‘जिजाऊ’ पुरस्कारानं सन्मानित.!

0
488

कणकवली | प्रतिनिधी | दि. १३ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘स्वराज्य’ संकल्पनाकार राजमाता जिजाऊ यांच्या जयंती दिनी सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष नीलम राणे यांच्या हस्ते कणकवली येथील कर्तबगार महिला उद्योजक सुप्रिया समीर पाटील यांना ‘जिजाऊ’ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.

राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीदिनी भाजपा महिला मोर्चातर्फे सिंधुदुर्गातील कर्तृत्ववान महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला. सुप्रिया पाटील या कणकवली शहरात गेली १३ वर्षे स्वतः इलेक्टरीक रिपेअरिंगचं दुकान चालवत आहेत. एम.ए. पर्यंत पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या सुप्रिया पाटील यांनी एस. एस. इलेक्टरीक वर्क या स्वमालकीच्या दुकानातून ग्राहकांना विनम्र आणि तत्पर सेवा देऊन ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. वाजवी दर आणि तत्पर सेवा हे पाटील यांच्या सेवेचं वैशिष्ट्य आहे. पाटील यांच्या या कर्तृत्वाची दखल घेत त्यांना सन्मानीत करण्यात आलं.

यांचाही करण्यात आला सन्मान 

जिल्ह्यातील अदिती भूषण बोडस-पडेल, रंजना रामचंद्र कदम-देवगड, निशा भास्कर गुरव-कणकवली, ज्योती गावकर, रेश्मा गुरुनाथ सावंत-कुडाळ तेडोली, प्रिया पांचाळ-पिंगुळी कुडाळ,श्रद्धा केळुसकर-मालवण,रुचिता नार्वेकर-मालवण,नेत्रा मुळ्ये-सावंतवाडी, सुजल सूर्यकांत गवस-दोडामार्ग, सुजाता देसाई-वेंगुर्ला आदी कर्तृत्ववान महिलांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर भगीरथ प्रतिष्ठानच्या डॉ. हर्षदा देवधर,महिला मोर्चा अध्यक्ष संध्या तेरसे,सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष समिधा नाईक,जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापती माधुरी बांदेकर, देवगड नगराध्यक्ष प्रियांका साळसकर, भाजपा जेष्ठ नेत्या अस्मिता बांदेकर, कुडाळ पं.स.सभापती नुतन आईर, जेष्ठ नेत्या नेत्राताई मुळ्ये, सुषमा खानोलकर, जेष्ठ नेत्या नगरसेविका उषा आठल्ये,कणकवली नगरसेविका मेघा गांगण,ओबीसी मोर्चा अध्यक्ष दिपलक्षमी पडते,कुडाळ उपनगराध्यक्ष सायली मांजरेकर, नगरसेविका साक्षी सावंत,कुडाळ शहराध्यक्ष महिला ममता धुरी, आदिती सावंत,माजी जिल्हा परिषद सदस्य चोरगे मॅडम,वेंगुर्ला महिला मोर्चा तालुका अध्यक्ष स्मिता दामले,कणकवली नगरसेविका प्रतीक्षा सावंत,सावंतवाडी शहराध्यक्ष मोहिनी मडगाकर,वेंगुर्ला शहर अध्यक्ष प्रार्थना हळदणकर, उष्णकला केळुस्कर-देवगड तालुका अध्यक्ष, वेंगुर्ले नगरसेविका श्रेया मयेकर,जिल्हा चिटणीस लक्ष्मी आरोंदेकर,कुडाळ महिला मोर्चा तालुका अध्यक्ष आरती पाटील, सरोज जाधव, प्राची तावडे,पिंगुळी महिला भाजपा अध्यक्ष साधना माडये,जिल्हा उपाध्यक्ष प्रियंका नाईक तसेच सिंधुदुर्ग जिल्हा भाजपाच्या असंख्य महिला पदाधिकारी-कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.