गळफास घेत युवकाची आत्महत्या..!

0
4220

कुडाळ | प्रतिनिधी | दि. १३ : तालुक्यातील पावशी बोरभाटवाडी येथील अभिषेक दिगंबर भोगटे, वय ४२  याने आज राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबतची फिर्याद कुडाळ पैलिसात सत्यवान मनोहर भोगटे यांनी दिली.

अभिषेक याने आपल्या राहत्या घरात बेडरूममध्ये गळफास घेतला. हि घटना नातेवाईकांना समजताच त्यांनी कुडाळ येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलीसांनी शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.