कणकवलीत गोवा बनावटीची दारू जप्त; एलसीबीची कारवाई

0
535

कणकवली | प्रतिनिधी | दि. १३ : स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने नांदगाव – गोसावीवाडी येथे अकरा हजार रुपये किमतीचा गोवा बनावटीचा दारू साठा जप्त केला. शांताराम भाऊ बांदिवडेकर (६०) याच्याविरुद्ध बुधवारी सायंकाळी ४ च्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली एलसीबीच्या पथकाने छापा टाकला असता आरोपी शांताराम भाऊ बांदिवडेकर याने त्याच्या घराच्या पाठीमागील बाजूस मोकळ्या जागेत त्याने ठेवलेल्या गोवा बनावटीच्या हनी गाईड दारूच्या बाटल्या मिळाल्या पोलिसांनी त्या जप्त केल्या.

या पोलीस कारवाईत एलसीबीच पोलीस उप निरीक्षक सचिन शेळके सहाय्य्क पोलीस निरीक्षक रामचंद्र शेळके हवालदार जीं बी कोयंडे पोलीस नाईक पी एस कदम महिला पोलीस पी ए कोरगावकर यांचा समावेश होता या प्रकरणी हवालदार रवी मनोहर इंगळे यांनी फिर्याद दिली आहे.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.