अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर दंडात्मक कारवाई..!

0
471

कणकवली | प्रतिनिधी | दि. १३ : अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर एकूण ३ लाख २ हजार २५ रुपयांची दंडात्मक कारवाई कणकवली तहसीलदार रमेश पवार यांनी केली.

विना परवाना वाळू वाहतूक करणारे दोन डंपर हुंबरठ येथे खनिकर्म विभागाने पकडून पुढील कारवाईसाठी तहसीलदारांच्या ताब्यात दिले होते. दोन्ही डंपरमध्ये एकूण साडेतीन ब्रास वाळू होती. वाळूवर १ लाख २ हजार २५ रुपयांचा दंड आकारण्यात आला. तर दोन्ही डंपरवर प्रत्येकी १ लाख असा एकूण २ लाख दंड आकारण्यात आला आहे. दोन्ही डंपर मालकांकडून कणकवली प्रांताधिकाऱ्यांसमक्ष प्रतिज्ञापत्र करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार पवार यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.